Subscribe Us

शैक्षणिक कामकाज नियोजन अंतर्गत दैनिक व दरमहा करावयाची कामे



दैनंदिन करावयाची कामे :-

१. शिक्षकांनी केलेल्या वार्षिक, मासिक व साप्ताहिक नियोजनाप्रमाणे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया करणे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करणे. 

२. 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण' योजनेअंतर्गत आहार वाटपकरणे व लाभार्थी संख्येची PM Poshan पोर्टलवर नोंद करणे.

३. VSK पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करणे.

दरमहा करावयाची कामे :-

१. दैनंदिन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आवश्यक साधनतंत्रे, अध्यापन पद्धती यांचे नियोजन करून प्रत्यक्ष गुणवत्तापूर्ण अध्यापन करणे.

२. अप्रगत विद्यार्थ्यांचा शोध घेणे. आवश्यकतेनुसार उपचारात्मक अध्यापन करणे.

३. HPC समग्र प्रगतिपत्रक भरणे.

४. विविध स्पर्धापरीक्षांसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करणे व विद्याध्यर्थ्यांना मार्गदर्शन करणे. शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे.

५. 'आनंददायी शनिवार' उपक्रम राबविणे,

६. विद्यार्थी लाभाच्या योजनांची अंमलबजावणी करणे.

७. शाळेचा परिसर, स्वच्छतागृह, वर्गखोल्यांची स्वच्छता नियमित करणे.

८. शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांना दाखला देणे व विद्यार्थ्यांना व पालकांना गरजेनुसार बोनाफाईड सर्टिफिकेट देणे.

९. FLN अंतर्गत माता गटाच्या Whats App ग्रुपवर पालकांना व्हिडिओ पाठवणे.

१०. महिनाअखेरीस मासिक पत्रके, उपस्थिती भत्ता इत्यादी माहिती देणे.

११. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तांदळ व इतर धान्यादी मालाची मागणी करणे, तो माल शाळेत पावतीप्रमाणे उतरून घेणे, व्यवस्थित ठेवणे, त्याची देखभाल करणे, नियमित हिशोब ठेवणे, विद्यार्थ्यांच्या द्रोज उपस्थितीप्रमाणे पोषण आहार शिजवून देणे, यावर देखरेख व सनियंत्रण करणे.

१२. प्रत्येक महिन्यातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत इंधन, भाजीपाला व पूरक आहार देयक ऑनलाइन तपासणी करणे व प्राप्त अनुदानातून देयक अदा करणे.

१३. सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहारांतर्गत किर्द, खतावणी, दरपत्रक निविदा फाईल, व्हाउचर (पावती) फाईल, साठा नोंदवही व इतिवृत्त इत्यादी रेकॉर्ड तयार करणे.

१४. शाळेतील सर्व प्रकारच्या अभिलेखातील नोंदी अद्ययावत करणे.

१५. शालार्थ प्रणाली‌द्वारे शिक्षक वेतन देयक तयार करून तालुकास्तरावर पाठवणे.

१६. विविध संस्था/NGO यांच्याशी झालेल्या करारामुळे राबवाव्या लागणाऱ्या उपक्रमांची अंमलबजावणी करणे.

१७. U-DISE PLUS पोर्टल-विद्यार्थी IMPORT, Left with TC करणे व आधार, भौतिक सुविधा इ. माहिती अपडेट करणे.

१८. केंद्र शासन व राज्य शासन स्तरावरून वेळोवेळी सुचित केलेल्या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी करणे.

१९. जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण, किशोर या मासिकांमधील आवश्यक उपक्रम शाळेत राबविणे.

२०. शालेय स्तरावरील विविध समित्यांच्या बैठकांचे आयोजन करणे.

वरील माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇

Click Here 


Post a Comment

0 Comments