Subscribe Us

1 जुलै च्या काल्पनिक वेतनवाढी बाबत शासननिर्णय

 


दिनांक ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या/ होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत..


दिनांक :- २७ सप्टेंबर, २०२४.

संदर्भ :- शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र. वेतन-२०२३/प्र.क्र.१३/सेवा-३, दि.२८.०६.२०२३.

शासन परिपत्रक :-

संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचना इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विजाभज प्रवर्गाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा, विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागु करण्यास शासन मान्यता देण्यात येत.

२. दि.३० जून रोजी सेवानिवृत्ती झालेल्या किंवा होणाऱ्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विजाभज प्रवर्गाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा, विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत विभागाच्या संबंधित क्षेत्रिय कार्यालयांनी संदर्भाधीन परिपत्रकातील सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇 

CLICK HERE

Post a Comment

0 Comments