महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय (विस्तार), दालन क्र. ४३९, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
अनुक्रमांक:-पे-1219/P.No.105TNT-3
प्रति,
दिनांक : १६.०८.२०२४
शिक्षण संचालक (माध्यमिक/प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय :- NPS, DCPS खाते नाही अश्या सेवानिवृत्त कर्मचा-यांचे सातव्या वेतन आयोगाचे हफ्ते रोखीने देण्याबाबत
संदर्भ:- 1) शासन निर्णय क्रमांक वेतन-1219/प्रो. क्रमांक 105/TNT-3, दिनांक 10.01.2020
२) माजी व्ही.पी.एस. श्रीकांत देशपांडे यांचे 19.02.2024 चे पत्र
उपरोक्त विषयावरील मा. माजी वि.प.स. श्रीकांत देशपांडे यांचे दिनांक १९.०२.२०२४ रोजीच्या पत्रान्वये NPS, DCPS खाते नाही अश्या सेवानिवृत्त कर्मचा-यांचे सातव्या वेतन आयोगाचे हफ्ते रोखीने देण्याबाबत विनंती केली आहे.
२.सन २००५ पूर्वी विनाअनुदान / अंशतः अनुदान तत्वावर कार्यरत असलेले परंतु सन२००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना (DCPS) / राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS) लागू असून यापैकी काही शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी यांनी तांत्रिक अडचणींमुळे राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे ((NPS) खाते उघडले नसल्याचे निदर्शनास आले आहे. सदर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना खाते / परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना खाते नसल्याने शासन निर्णय दिनांक १०.०१.२०२० मधील तरतुदीनुसार सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करता येत नाही. तथापि, ज्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांनी राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे (NPS) खाते उघडले नाहीत व ते सेवानिवृत्त झालेले आहेत फक्त अशा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाचे हफ्ते रोखीने देण्यात यावे
(रोहिणी किरवे)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
0 Comments