सन २०२३-२४ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीद्वारे शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती संगणकीकृत करणेबाबत मार्गदर्शक सूचना.
सन २०२३-२४ या वर्षामध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती दि. ३१ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत संगणकीकृत करून अंतिम करण्याकरिता केंद्र शासनाकडून कळविण्यात आले आहे. संदर्भिय पत्र क्र. २ नुसार राज्य शासनाकडून समग्र शिक्षा या योजनेच्या सन २०२४-२५ व २०२५-२६ वार्षिक नियोजन व अंदाजपत्रकांचा आराखडा तयार करून माहे डिसेंबर, २०२३ पर्यंत शासनास सादर करणेबाबत कळविले आहे. या पत्रानुसार आराखडा तयार करताना सन २०२३-२४यु-डायस प्रणालीमधील माहितीवर आधारित तयार करण्यासाठी नमूद केले आहे. यु-डायस प्रणालीमध्ये सन २०२२-२३ या वर्षामध्ये १,०८,४५१ शाळांची,२,११,५०,०६६ विद्यार्थ्यांची व ७,४२,३१६ शिक्षकांची माहिती संगणकीकृत करून अंतिम करण्यात आली आहे. संगणकीकृत केलेल्या माहितीनुसार ९७.२७% विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झाली असून त्यापैकी ६९.५१% विद्यार्थ्यांचे आधार Validation शाळांकडून पूर्ण झाले आहे आणि ८८.९% शिक्षकांची आधार नोंदणी पूर्ण झाली आहे व त्यापैकी ६७.७% शाळांच्या लॉगिनमधून आधार Validation पूर्ण झाले आहे.याबाबत आपणास कळविण्यात येते की, सन २०२३-२४ यु-डायस प्लस प्रणाली केंद्रशासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांचेकडून शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती नोंदविण्याकरिता प्रणाली सुरू केली आहे.
सविस्तर माहिती वाचण्यासाठी व शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
0 Comments