Subscribe Us

केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रम ( सन २०२२-२७)


 केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रम ( सन २०२२-२७)

केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रम योजनेसाठी साक्षरतेकडून समृध्दीकडे (From Literacy to Prosperity) ही Tag Line देण्यात येत आहे. योजनेचा कालावधी एप्रिल २०२२ ते मार्च २०२७ असा आहे. राज्यात मागील आर्थिक वर्षात (सन२०२२-२३) राज्याकरीता ६ लक्ष २० हजार एवढे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. विविध कारणामुळे प्रत्यक्षात याबाबतची कार्यवाही व अंमलबजावणी  शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतरच सूरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे मागील वर्षाचे उद्दिष्ट आणि चालू वर्षातील २०२३-२४ चे ६ लक्ष २० हजार उद्दिष्ट लक्षात घेता चालू आर्थिक वर्षात एकूण १२ लक्ष ४० हजार उद्दिष्टानुसार राज्यात कार्यवाही करणे अपेक्षित आहे. प्रत्येक जिल्हयाचे दोन्ही वर्षांचे उद्दिष्ट राज्यस्तरावरून निश्चित करून देण्यात आलेले आहे. सदरचे उद्दीष्ट सन २०११ जनगणनेतील निरक्षर संख्येनुसार ठरविण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत निरक्षरांची नावनिहाय माहिती उपलब्ध नसल्याने व २०११ च्या जनगणनेस १२ वर्षाहून अधिक कालावधी उलटला असल्याने सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी ऑफलाईन पध्दतीने निरक्षरांचे सर्वेक्षण करणे क्रमप्राप्त आहे.
    केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रम ( सन २०२२-२७) ची सविस्तर माहिती वाचण्यासाठी व प्रपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇

Post a Comment

0 Comments