Subscribe Us

ऑनलाईन प्रशिक्षणासाठी #महाज्योती तर्फे OBC/VJNT तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना "मोफत टॅब" व 6 GB/Day

 



ऑनलाईन प्रशिक्षणासाठी #महाज्योती तर्फे OBC/VJNT तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना "मोफत टॅब" व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येतो.. पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा! 

  MHT-CET/ JEE / NEET - २०२५ करीता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत #महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून #अर्ज मागविण्यात येत आहे. 

महाज्योती तर्फे JEE/NEET/MHT-CET 2025 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना टॅब व प्रशिक्षण देण्याकरिता नोंदणी अर्ज मागविण्यात येत आहेत. परंतु अर्ज करताना काही विद्यार्थ्यांजवळ नॉन क्रिमीलेअर, जात प्रमाणपत्र व रहिवासी दाखला नसल्यामुळे अर्ज भरतांना अडचणी येत आहेत असे काही विद्यार्थ्यांनी महाज्योतीला कळविले आहे. त्या करिता विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दहावीची गुणपत्रिका ज्यावेळेस मागविण्यात येईल तेव्हा विद्यार्थ्यांनी जाती प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर व अधिवास प्रमाणपत्र अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी सगळ्या विद्यार्थ्यांनी 15 मे 2023 त्यापूर्वी जाती प्रमाणपत्र, डोमेसाईल व जात प्रमाणपत्र तयार करावी.


सद्यस्थितीत खालील कागदपत्रां आधारे अर्ज करता येईल:

•फोटो

•स्वाक्षरी

•आधार कार्ड

•९वी ची गुणपत्रिका

•१० वी बोर्ड परीक्षेचं प्रवेशपत्र


सदर योजनेची विस्तृत माहिती आणि लाभ घेण्यासाठी महाज्योतीच्या पुढील संकेतस्थळावर जावे . 

अर्ज करण्याची लिंक - Click Here

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी - 

Click Here

Post a Comment

0 Comments