Subscribe Us

कर्मचार्यांचा संप योग्य की अयोग्य?


 

 मित्रांनो आपण गेली 10-15वर्षे पासून आपल्या जुनी पेंशन या घटनात्मक हक्क व अधिकारासाठी संविधानीक मार्गाने लढत आहोत. जुनी पेंशन ही मागणी नाही तो आपला हक्क आहे आणी तो आपण मिळवणारच. जुनी पेंशन' हा आपला जिव्हाळ्याचा, भविष्याचा,कुंटूबाचा लेकरा-बाळाचा प्रश्न आहे. आपला हक्क मागणे , हक्क व अधिकारासाठी लढणे ही गोष्ट अयोग्य कशी असु शकते मित्रांनो. म्हणून आपला संप योग्यच आहे

   जुनी पेंशन मिळावी म्हणून विविध़ संघटनांनी वेळोवेळी निवेदन, मोर्चे, आंदोलन केली पण गेंड्यांची कातडी असलेल्या सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला नाही. पण मित्रांनो 14 मार्च पासून पुकारलेला बेमुदत संप हा महाराष्ट्रातील विविध संघटना येऊन पुकारलेला संप आहे यामध्ये महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामध्ये ज्यांना जुनी पेंशन लागू आहे ते बंधु- भगिनी सुद्धा सहभागी झालेले आहेत.या संपाची व्यापकता बघून शासनाने कुंटुंब निवृत्ती वेतन व उपदान चा निर्णय मंत्रीमंडळात घेतला. 

  आपल्या संपाविषयी नकारात्मक बातम्यांना आपण सकारात्मकतेने व संयमाने उत्तर देऊ कारण आपला संप योग्य वळणावर आलेला आहे. आपली भूमिका ही सावध असली पाहिजे. आपला संप चिरडण्याचा प्रयत्न होऊ शकतो, आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न होऊ शकतो तरी आपण न घाबरता आपल्या जुनी पेंशनच्या मागणीवर ठाम राहायला पाहिजे.

  तसेच जे बंधू, भगिनी आणखीही संपात सक्रिय सहभागी झाले नाही त्यांनी आपल्या घटनादत्त हक्काच्या लढाईत मोठ्या ताकतीने सहभागी व्हावे. 

  मित्रांनो आपला संप हमखास यशस्वी होणार आहे फक्त गरज आहे आपण एकत्र येऊन लढण्याची... 

एकच मिशन, जुनी पेंशन! 

हमारी युनियन, हमारी ताकद


 

Post a Comment

0 Comments